
- कथा

- अभिनय

- दिग्दर्शन

- संगीत

राजापूर गावात महादेवाच्या पूजेचा मान मिळविण्यासाठी प्रतापराव देशमुख आणि शंकरराव मोहिते या घराण्यांची चढाओढ आणि तेथील ग्रामीण राजकारण यातून साकार झालेली कथा म्हणजे शर्यत.
बैलगाड्यांच्या शर्यतीत जे घराणे जिंकेल त्यांना महादेवाच्या पुजेचा मान मिळतो. धनंजय (सचिन पिळगावकर) हा शंकररावांकडे कामाला असलेला गडी. शंकररावांकडून शर्यतीत भाग धनंजय घेत असतो. पाच वर्षांपूर्वी धनंजयला (सचिन) प्रतापरावांनी (विद्याधर जोशी) कट कारस्थान रचून शर्यतीत हरवल्यामुळे निराश होऊन धनंजय गाव सोडून शहरात निघून जातो. पण छोट्या भावाच्या (संतोष जुवेकर) उपद्व्यापामुळे अशी काही परिस्थिती निर्माण होते की भावाला मदत करण्यासाठी धनंजयला आपले मालक शंकररावांकडे परत यावं लागतं. शंकरराव त्याच्या मदतीला तयार होतात पण ते शर्यतीत परत भाग घेण्याच्या अटीवर. येथून सुरु होते खरी कट कारस्थानांची शर्यत.
सचिन सारख्या दिग्गज अभिनेत्याला अभिनय करण्यासाठी पुरेपूर वावच दिला नाही असं जाणवतं. संतोष जुवेकर आणि तेजश्री प्रधान हे फक्त ‘फिलर’ म्हणून चित्रपटात दिसले आहेत. नीना कुलकर्णी यांनी शंकररावांच्या पत्नीचा अभिनय उत्तम करून ‘शर्यत’ मध्ये आपला मान राखला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेवून बनविलेला ‘शर्यत’ कथेत नाविन्य नसल्यामुळे प्रेक्षकांची निराशा करतो.
चित्रपटात सचिन पिळगावकरसह, नीना कुलकर्णी, तेजश्री प्रधान, विद्याधर जोशी, उदय सबनीस, संतोष जुवेकर, किशोर चौगुले, राजन पाटील, पूनम जाधव, संपदा जोगळेकर, गणेश वेठे या कलाकारांनी अभिनय केलाय. पाहुण्या भूमिकेत भार्गवी चिरमुले, नेहा पेंडसे, जयवंत वाडकर या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
युवा संगीतकार चिनार-महेश यांनी दिलेलं संगीतमात्र उत्तम जमलं आहे. शब्बीर नाईक यांनी छायाचित्रण केलं असून संकलन सतीश पाटील यांचे आहे










![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)






![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








