महेश मांजरेकर करत असलेल्या ‘शिक्षणाचा आईचा घो’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान काम करणार असल्याचं आता नक्की झालंय. आधी तारखांवरून ‘हो-नाही’ म्हणत असलेल्या सलमानने अचानकच चित्रपटासाठी तारखा दिल्या आहेत. यामागचे खरे कारण असे की प्रकाश राज यांचा लवकरच रिलीज होत असलेला ‘धोनी’ हा तमिळ चित्रपट मांजरेकरांच्याच मराठी चित्रपटावर आधारीत आहे.
याबद्दल महेश मांजरेकर म्हणाले की , सध्या दक्षिण भारतीय चित्रपट हिंदीमध्ये रिमेक होण्याचं प्रमाण खूप वाढलयं. त्यामुळे प्रकाश राज यांच्या या चित्रपटाचे हक्क बॉलीवूडमध्ये कोणी दुसऱ्याने घेण्या आधीच मला सलमानला घेऊन हा चित्रपट बनवायचा आहे. प्रकाश हा माझा मित्र आहे आणि त्याने या चित्रपटाचा तमिळ मध्ये रिमेक करण्याबद्दल विचारल्यावर मी तात्काळ त्याला होकार दिला.
क्रिकेटमध्ये रस असलेल्या एका शाळकरी मुलाला येणारं अभ्यासाचं दडपण अशी प्रकाश राज यांच्या चित्रपटाची थीम आहे. महेश मांजरेकर म्हणण्यानुसार शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. ‘शिक्षणाचा आईचा घो’ मराठीत म्हणावा तसा चालला नाही – तेव्हा हिंदी आणि तमिळ प्रेक्षकांना तो किती आवडेल हे लवकरच कळेल. सल्लुमियॉं या भूमिकेत काय जादू करतात तेही लवकरंच दिसून येईल.



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








