[फिल्लमबाजी.कॉमच्या वाचक सोनाली जोशी यांनी 'पिंजरा' मालिकेबद्दल केलेले मुक्तचिंतन...कसे वाटले ते जरूर कळवा!]
गेले काही महिने गेट-टूगेदर मध्ये हमखास कानावर येणारे संवाद -
“आता कुठे वीर आनंदीचे लग्न झाले…”
“आमच्याकडे मीच नाही माझा नवरासुद्धा बघतो पिंजरा…”
“गेल्या दोन भागात आक्कांना फक्त पाठमोरं दाखवलं . काय झालं असेल?”
“वीर काय क्यूट दिसतो नाही?” ( खर हॅंडसम असंच म्हणायचा असतं एका मैत्रिणीला…)
“या सिरियल्समधून कळतात लेटेस्ट फॅशन ट्रेंड… नारायणीचे पंजाबी सूट्स क्लास आहेत.”
“आक्कांसारखी ऑरेंज बॉरर्डरची काळी साडी आणायची आहे…”
भारतीय मालिका आणि चित्रपट हे फॅशन ट्रेंडसाठीही बघायचे असतात…आणि हो जर भारताबाहेर असाल तर जरा जास्तच (किमान आम्ही ते का बघतो – याची साधी उत्तरे फॅशन आणि नॉस्टालजिया अशी आहेत. मी ते नाकारत नाही.)
मालिकांचा विचार करायचा तर राम कपूर, मोहनीश बहल सध्या लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या मालिकांना अग्रक्रम आहे. प्रेक्षकांमधे स्त्रियांची संख्या जास्त आणि या मालिकांचे विषयच असे आहेत की त्यामुळे त्या मालिका व हे दोघे लोकप्रिय आहेत यात काही नवल नाही. नोकरी, घरकाम, मुले सगळे सांभाळून टिव्हीकडे नजर टाकणा-या किंवा खूप वर्षांनी आता हाताशी थोडा जास्त वेळ आहे म्हणून मुद्दाम भारतीय टीव्ही बघणा-या सर्व ४०+ या वयोगटात चक्क एक मराठी चेहरा सध्या पुन्हा चर्चेत आहे…
भारतातल्या माझ्या दोन मैत्रिणींनी ‘पिंजरा’ सुरु असतांना आम्ही फोनकॉल घेत नाही असं शेवटी मला सांगितलं आहे.
अनेक जण जेव्हा कंटाळून फक्त नव्या नव्याच मालिका पाहतात त्यावेळी कशामुळे ‘पिंजरा’ बघताहेत हे सर्व? एवढं काय आहे असं या मालिकेत?
या मालिकेत आतापर्यंत हे सर्व करून झालं आहे. (तरीसुद्धा) पिंजरा मालिकेला १६ नामांकने आणि झी मराठीचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कारही मिळाला. (एकाच निर्मात्याच्या एक सोडून चार मालिका जर एकाच वाहिनीवर असतील तर बक्षिस मिळणारंच…नाही का? त्या बक्षिसाचं काय एवढं? कसं मिळतं बक्षिस ते पण माहिती आहे…इत्यादी…)
दिग्दर्शक , कलाकार आणि पिंजरा टीमने ते बक्षिसाचे श्रेय वाटून घ्यायला काहीच हरकत नाही पण त्यात सिंहाचा वाटा आहे एका त्रिकुटाचा – नागनाथ, तात्या आणि आक्का, आणि अर्थात मालिकेचा नायक वीर याचा! कथानकानुसार खरं सांगायचं तर प्रत्येक मालिकेत नायक नायिकेचे पारडे जड असते. प्रेक्षकांची सगळी सहानुभुती प्रेम त्यांनाच मिळण्याची तरतूद केलेली असते. त्यात नायक नायिका जर लोकप्रिय कलाकार असतील तर मग प्रश्नच नाही. पण एक नवा ट्रेंड - ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘पिंजरा’ या दोन्ही मालिकेतले एक साम्य सहज जाणवणारे ते म्हणजे- खलनायक /खलनायिका यांचा दर्जेदार अभिनय… कृपया नोंद करा मी अभिनय म्हणते आहे – ओव्हर अॅक्टींग म्हणत नाही…
कोणतीही मालिका सुरु होऊन तीन चार महिने झाले की मग बघायचीच नसते… दुसरी नवी सुरू होतेच त्यादरम्यान.. मग ती नवीनच बघायची! असं केलं तरच मालिका पाहू शकतो.
अगं ज्यांना वेळ घालवायला दुसर काही नाही त्यांच्याकरता असतात या मालिका!
आपण आठवड्यातून एखादा भाग पाहायचा फार तर फार. कथानक पुढे जातच नाही. न्यायचंच नसतं…असे अनेक प्रेमळ सल्ले डोक्य़ात ठेवून मी पिंजराचा फक्त पहिला भाग बघायचा असं ठरवलं. किंवा माझी सहनशक्ती त्याहून जास्त राहणारच नाही अशी खात्री होती!)
माझ्या दृष्टीने मालिकेच शीर्षकगीत हा नेहमीच उत्सुकतेचा आणि आवडीचा विषय.. त्यामुळे शीर्षक गीत संपल, फार तर फार पहिला भाग पाहून मी पिंजरा आटोपणार होते. पण….घडल भलतच.. फक्त माझ्याच बाबत नाही इतर अनेकांच्या बाबत पिंजरा मालिकेचा अनुभव तसाच आहे…पिंजरा सुरू होऊन एक वर्ष झाले! फेसबुकावरचा अपडेट.. चुकीचा असूच शकत नाही:) या मालिकेशी संबंधित काही जण त्यांच्या नव्या प्रोजेक्टमधे मग्न असतील, काही कलाकार ही मालिका सोडून दुस-या रोलमधेही. सोयीनुसार कलाकार एखाद्या भागात आणणे आणि काढणे यावर (आमचा )आणि निर्मात्यांचाही नाईलाज असावा.
पिंजराला फक्त एक वर्ष होत आहे…वीर आनंदीचे नुकतेच (अखेर एकदाचे) लग्न झाले तरी अजून बरच काही व्हायच आहे. हे मनात ठेवूनच लोक बघणार आहेत मालिका! वीर ( भूषण प्रधान) आनंदीला कधी अंतर देऊ नकोस. तुम्ही दोघे खूप गोड हसता!
पण पिंजरा बघण्यासाठी फक्त एवढच पुरेसं नाही. कोणतेही आणि इतर कुठलेही कारण दिले तरी एका चेह-याचा या मालिकेतला वाटा नाकारता येणारच नाही तो चेहरा म्हणजे आक्का!
आक्कांच्या व्यक्तिरेखेला मिळालेली सुमुखीच्या अभिनयाची जोड अफलातून आहे. मालिकेचा पहिला भाग होताच हा ओळखीचा चेहरा कोण ते शोधण्यासाठी किती जणांनी गुगलकडे धाव घेतली हे कोण मान्य करणार आहेत विचारा स्वत:ला:) नाव कळल्यावर, ओह ती
शांतीमधली आयेशा म्हणजेच सुमुखी ! अवंतिकेत पण होतीच ना असही आपल्या मनात आले ते कोण उघडपणे मान्य करेल ? (गेली काही वर्षे मालिकात कलाकारांची नावेही दाखवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे..का? माहिती नाही) .
can we make this more interactive?-
- मंडळी, please कलाकारांची नावे द्या!
- स्मरणरंजन हे मुख्य कारण असले तरी सध्याचे भारतीय कौटुंबिक वातावरण कसे आहे, आजची पिढी कशी आहे, ती पिढी इतरांशी कशी वागते ते आम्ही या मालिकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ( या मालिका, व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत हे आम्हाला माहिती आहे तरीसुद्धा)
- फॅशनचा मागोवा घेणे हे उद्दिष्ट आहेच!
- फेसबुकाचा अतिशय प्रभावी वापर या मालिकेच्या टीमने केला आहे. तो भविष्यात तसाच राहील अशी खात्री आहे. सर्व टीमचे याकरता आभार.
- पब्लिसिटी आणि मार्केटिंग करता इतर कार्यक्रम आहेत..कृपा करून इतर मालिकेतली पात्रे या मालिकेत आणू नका.लोकप्रिय पात्र आणणे आणि ओळख करून देण्याकरता आणणे यात फरक आहे.(तुम्ही तुमचे वेगळेपण सिद्ध करू शकता)
- कोणत्याही पात्राला त्याच्या वृत्तीबाहेर वागायला लावू नका.. तसे झाले तर ओव्हर अॅक्टिंगचा आधार घ्यावा लागतो. (सुनेचा छळ करतांना सासवा ओव्हर अॅक्टींगचा हात धरतात ही परंपरा आहे..)
आक्कांच्या हातात पिंज-याचा कंट्रोल आहे तोवर आम्ही निश्चिंत आहोत. We like Pinjara .. Keep up the good work!




![सदाबहार अशीही बनवाबनवी! [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/35Ashi.Hi_.Banva_.Banvi_.19-180x110.jpg)







![‘शाळा’ – शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी…[Review]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/01/Shala-Featured-50x50.jpg)

![सदाबहार अशीही बनवाबनवी! [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/35Ashi.Hi_.Banva_.Banvi_.19-50x50.jpg)
![दादांचा सोंगाड्या [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/023DadaUshaSongadya-50x50.jpg)
![1. सामना [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/1.-Samna-50x50.jpg)






Comments are closed.