ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी प्रामुख्याने अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे यांच्या धमाल चित्रपटांमुळे गाजली. त्यातही लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात मराठी चित्रपट रसिकांचा लाडका ‘लक्ष्या’ आजही लोकांच्या मनात घर करून आहे. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेला उत्तम अभिनेता म्हणून त्याची ओळख सर्वश्रुत आहेच.
‘टुरटुर’ या धमाल नाटकापासून आपला अभिनय प्रवास सुरु करत या अवलिया अभिनेत्याने रंगमंच, मालिका आणि चित्रपटसृष्टी अक्षरशः दणाणून सोडली.तसेच आपल्या अभिनय सामर्थ्यावर मराठीबरोबरच हिंदी मध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली. हसवाफसवी, शुभ बोल नाऱ्या, शेम टु शेम, धुमधडाका, झपाटलेला, धागडधिंगा, गोष्ट धमाल नाम्याची इत्यादी चित्रपटांमधून पोट धरून हसवलेच, पण त्याचबरोबर’एक होता विदुषक’ सारख्या चित्रपटांमधून गंभीर अभिनयाचे दर्शन घडवत आपल्यातील अष्टपैलू अभिनेत्याचे गुण देखील लोकांना दाखवले. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला सलाम करीत झी टॉकीज ‘लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृती जागवत त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव’ साजरा करत आहे. १३ डिसेंबर ते १७ डिसेंबरच्या दरम्यान आपल्या लाडक्या ‘लक्ष्या’चे काही धमाल लोकप्रिय चित्रपट या महोत्सवादरम्यान झी टॉकीजवर दाखविले जातील.
१३ डिसेंबर – हमाल दे धमाल
१४ डिसेंबर- कुठे कुठे शोधू मी तिला
१५ डिसेंबर – मज्जाच मजा
१६ डिसेंबर – अशी ही बनवाबनवी
१७ डिसेंबर – बाळाचे बाप ब्रम्हचारी
काही चित्रपट असे असतात की ते कितीही वेळा, कुठूनही आणि कधीही पाहू शकतो. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन या तिघांचा ‘अशी ही बनवाबनवी’ हा असाच एक चित्रपट. कितीही वेळा पहा आणि पोट धरून हसा या वर्गवारीतला. शुक्रवार १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट पाहता येईल. आणि या चित्रपट महोत्सवाची सांगता शनिवार १७ डिसेंबर रोजी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे यांच्या ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या विनोदी चित्रपटाने होईल.





![लक्ष्मीकांतच्या यशाची रुही बेर्डे वाट बघते आहे! ['गंधर्व': 1985]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/03/Marathicha-Sansar03_Laxmikant-Berde-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








