
- कथा

- अभिनय

- दिग्दर्शन

- संगीत

मराठी सिनेसृष्टीत कित्येक विनोदी चित्रपट दरवर्षी येतात आणि जातात. काही पाचकळ तर काही मजेदार. प्रासंगीक विनोदी चित्रपटांची संख्या तर कितीतरी मोठी, यातच भर घातलीय अंकुश चौधरी दिग्दर्शित झकास ने. घोळ आणि अफरातफरी असलेल्या या चित्रपटातून झकास मनोरंजन होतं.
तो (अंकुश चौधरी) या शहरात आला ते कष्ट करुन, घाम गाळून, पैसे कमवायला! लहानपणी शिकवलं होतं की माणसाला रोजच्या जगण्यासाठी फार काय लागतं? त्याची मुलभूत गरज असते ती अन्न, वस्त्र आणि निवारा! त्यासाठीच खरंतर तो शहरात आला. पण शहरात आल्यावर त्याची गरज झाली, रोटी, गाडी आणि मकान!
शहरात आल्यावर त्याला ‘रोटी’ म्हणजेच नोकरी दिली ती अनघाने(पूजा सावंत). अनघाची स्वत:ची जाहिरात कंपनी आहे. या जाहिरात कंपनीत तो महत्त्वाच्या पदावर काम करतो. त्याच्या बुद्धीवर, त्याच्या कर्तबगारीवर अनघा बेहद खुष आहे. अनघाने त्याच्यातल्या कलावंताला ओळख दिली, आणि त्याच्यातच आपला ‘हिरो’ शोधतेय.
तर रुबाबात रहायला, फिरायला त्याला नेहाने (सई ताम्हणकर) शिकवलं, नेहानेच त्याला गाडी दिली. नेहा ही प्रोफेशनल फोटोग्राफर. चेहरे टिपणारी. उत्तम फोटोग्राफी करणारी नेहा मनाने तितकीच पारदर्शी. त्याच्यासारख्या राजबिंडया तरुणाला नेहाने दिला एक आत्मविश्वास, एक ‘अॅटिटयूड’! नेहादेखील त्याच्यावर मनापासून प्रेम करतेय.
तर त्याला रहायला घर दिलं ते मंजुळाने(अमृता खानविलकर), नाव जरी मंजुळा असलं तरी ती आहे तिखट झणझणीत कोल्हापुरी मिरची!
या तिघीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करताहेत. पण या तिघी एकत्र आल्या तर?? तर त्याचं काय होईल? काय होईल काय, यांच्यातूनच होईल एक झकास कॉमेडी.
अंकुश चौधरी या आधी ‘साडे माडे तीन’ मधून दिग्दर्शनात उतरला खरा पण एक स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून ‘झकास’ द्वारे त्याने मराठी प्रेक्षकांना एक ‘हॅपी न्यू ईयर’ गिफ्ट दिलाय असा म्हणायला हरकत नाही.
‘झकास’ एक कौटुंबिक मनोरंजन आहे. या चित्रपटाचं वेगळेपण हे की यात कुठेही कॉमेडीचा अतिरेक करायचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. अमृता खानविलकरची गावरान भूमिका मात्र तेवढी विश्वासार्ह वाटत नाही पण त्यातले विनोदी संवाद हसवतात. सगळ्या कलाकारांची कॉमेडी हसवते पण काही जुनियर कलाकारांची कॉमेडी, रडवण्यासाठीही कमी करणार नाही.
दीपक नायडू यांची कथा, नितीन दीक्षित आणि अंकुश चौधरी यांची पटकथा व संवाद, संजय जाधव यांचे छायांकन, अभिजीत कवठाळकरचं संगीत आणि अंकुश चौधरीच्या दिग्दर्शनाने नटलेली ही ‘झकास’ कॉमेडी असून, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, पूजा सावंत, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, विकास समुद्रे यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यांच्यासोबत अतुल परचुरे, जयवंत वाडकर यांनीही यात बहार उडवलीय.
स्वस्तात मस्त मनोरंजन हवं असेल तर झकास पाहायला नक्कीच काही हरकत नाही.









![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)









Comments are closed.