मराठी चित्रपट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, अशी ओरड नेहमीच वेगवेगळ्या भागांतून, घटकांतून येत असते. महाराष्ट्र किंवा भारतापुरताच नव्हे तर जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मराठी रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘जन गण मन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित अभ्यंकर आणि गोल्डन ड्रिम्स प्रॉडक्शन यांनी हा चित्रपट पारंपारिक प्रदर्शनाबरोबर ऑनलाईनही प्रदर्शित करण्याचं ठरवलंय. डिजिटल स्वरुपात प्रदर्शित होणारा हा चित्रपट आपल्याला आपल्या मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटवर बघणं शक्य होणार आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी चित्रपटगृहात आणि ऑनलाईन प्रदर्शित होणारा हा भारतातला पहिलाच चित्रपट ठरलाय असं अमित अभ्यंकर यांनी सांगितलं.
हा चित्रपट ऑनलाईन रिलीज होणार आहे तो Mundu.tv या सुविधेद्वारे. या वेबसाईटवरून तुम्ही त्यांचे अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करून हा चित्रपट बघू शकता.
या सिनेमात गावाकुसाबाहेर राहणाऱ्या पारधी समाजाचं जीवन प्रतिबिंबीत केलं आहे. दुर्गम भागातल्या शाळेत असणारा एक ध्येयवेडा शिक्षक आणि केवळ मधल्या सुट्टीतल्या जेवणासाठी शाळेत येणारे विद्यार्थी यांच्यातल्या परस्पर नात्यावर चित्रपट भाष्य करतो. बदली करण्याच्या उद्देशाने धडपडणारा शिक्षक पाड्यावर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या जिद्दीने थक्क होतो. मनोरंजनाबरोबरच एक छान संदेश देणारा आणि आपल्याला विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे.
या चित्रपटात आपल्या सकस अभिनयाद्वारे या वर्षीचा पुणे चित्रपट महोत्सव गाजवणाऱ्या नंदू माधव यांच्याबरोबर संतोष जुवेकर, मधुरा वेलणकर, उदय सबनीस, संदीप मेहता असे दिग्गज कलाकार दिसणार आहे. याशिवाय, या वर्षीच्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बाल कलाकार ठरलेला चिन्मय संत यात शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मुलाच्या मुख्य भूमिकेत आहे. अस्मिता जोगळेकरही या चित्रपटात बालकलाकार म्हणून चमकली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद समीर जोशी यांचे आहे. दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. संदीप-सलील या आघाडीच्या जोडीने या चित्रपटाला संगीत दिलंय.
एका पूर्णपणे नव्या विषयाचा हा चित्रपट अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे. शिक्षक- विद्यार्थ्यांची शाळेतल्या गमती जमती बघायला आणि शाळा शिकण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीला सलाम करायला २६ जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘जन गण मन’ जरूर पहा.



![सदाबहार अशीही बनवाबनवी! [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/35Ashi.Hi_.Banva_.Banvi_.19-180x110.jpg)







![‘शाळा’ – शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी…[Review]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/01/Shala-Featured-50x50.jpg)

![सदाबहार अशीही बनवाबनवी! [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/35Ashi.Hi_.Banva_.Banvi_.19-50x50.jpg)
![दादांचा सोंगाड्या [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/023DadaUshaSongadya-50x50.jpg)
![1. सामना [ग्लोरियस फिफ्टी]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/02/1.-Samna-50x50.jpg)






Comments are closed.