महाराष्ट्राची अस्सल लोककला असूनही केवळ पुरूषांचं मनोरंजन करणारी कला असं म्हणून, लावणी पांढरपेशा मध्यमवर्गीयांनी नाकारली. सुरुवातीला मराठी चित्रपटांचा अविभाज्य घटक असलेली ही लावणी नंतर मात्र चित्रपटात दिसेनाशी झाली. नेमकी हीच मानसिकता पुसून टाकण्यासाठी आणि आपल्या या लाडक्या लोककलेला सन्मानाने घराघरात पोहोचवण्यासाठी ई टीव्ही मराठीवर रमेश देव प्रॉडक्शनचा ढोलकीच्या तालावर हा रिएलिटी शो सुरु झाला आहे. मराठीतल्या आघाडीच्या तारकांनी आणि काही प्रथितयश लावणी नर्तिकांचा यात सहभाग आहे.
बैठकीची लावणी, पारंपारिक लावणी, छक्कड असे लावणीचे विविध प्रकार आणि वेस्टर्न, शास्त्रीय संगीताबरोबर लावणीची जुगलबंदी असे अनेक प्रकार यात सादर होत आहेत. सर्व नृत्यांगनांचा बहारदार परफॉर्मन्स आणि त्यांच्या दिलखेचक अदांमुळे प्रेक्षकांची या शोला चांगलीच पसंती मिळतेय.
दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमाचा गण-गवळण हा स्पेशल एपिसोड आपल्याला ११ आणि १२ जानेवारीला पाहायला मिळेल. या खास एपिसोडमध्ये सर्व नृत्यांगना दिसणार आहेत गवळणींच्या रुपात. ‘पानां-पानांत दिसतो कान्हा’, ‘गेला सोडूनी मजसी कान्हा’, ‘कशी गवळण राधा बावरली’ अशा विविध गवळणी या एपिसोडमध्ये सादर होतील. या खास एपिसोडसाठी खास उपस्थिती असणार आहे ज्येष्ठ लावणी नृत्यांगना वर्षा संगमनेरकर यांची.



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)









Comments are closed.