प्रेमात कोण पडेल सांगता येत नाही, प्रेम ठरवूनही करता येत नाही. प्रेम हा आपल्या सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा विषय आहे. इरा आणि मिहीर यांची अशीच एक प्रेमकहाणी ‘थोडी खट्टी थोडी हट्टी’ या गुढीपाडव्याला आपल्यासाठी घेऊन येत आहेत दिग्दर्शक सचिन वाघ.
‘असंभव’ मधली उमेश कामत आणि उर्मिला कानेटकर यांची हिट जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. याशिवाय, जयमाला शिलेदार, अक्षय पेंडसे, राघवेंद्र कडकोळ, विद्याधर जोशी असे आघाडीचे कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. तरुणांना आवडेल असा, हलका-फुलका रोमान्स आणि रहस्य असलेला हा चित्रपट आहे असं दिग्दर्शक सचिन वाघ म्हणतात.
दिग्दर्शक सचिन वाघ यांचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे या चित्रपटाबद्दल संपूर्ण टीम खूप उत्सुक आहे. त्याचबरोबर उमेश कामत आणि उर्मिला कानेटकर यांच्यातली केमिस्ट्री कशी काय काम करते याबाबतही उत्सुकता असणार आहे. या चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे तर गाणी लिहिली आहेत वैभव जोशी यांनी. हलक्या फुलक्या विनोदांच्या सोबत इरा आणि मिहीर यांची ही लवस्टोरी आपल्याला लवकरच प्रेक्षागृहात पाहायला मिळेल…ती आपल्याला कशी वाटते ते लवकर कळेलच.



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








