झी मराठीवरील ‘एकाच या जन्मी जणू’ या मालिकेतील नायिका अंजली आणि नायक श्रीकांत यांचे लग्न आता होणार आहे. असंख्य अडचणींना पार करत, अनेक संकटांवर मात करून आता हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज झाले आहेत. तसेच या दोघांचे लग्न आणि रिसेप्शन तितक्याच धुमधडाक्यात करण्याची तयारी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

मंगळवारी, १८ ऑक्टोबर रोजी एक तासाच्या विशेष भागात हा लग्नसोहोळा चाहत्यांना पहायला मिळणार आहे.



अंजली आणि श्रीकांत यांच्या रिसेप्शनसाठी काही खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बंड्या आणि सरिता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आपल्याला दिसतील. अंजली आणि श्रीकांतला त्यांच्या नवीन संसारासाठी शुभेच्छा देण्यासाठी काही खास पाहुण्यांना या सोहळ्यामध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. झी मराठीवरील आयडिया सारेगमप मधील प्रसेनजित कोसंबी, विश्वजीत बोरवणकर आणि नेहा वर्मा आपली गाणी पेश करून या कार्यक्रमाची रंगत वाढवतील. तसेच ‘फू बाई फू’ मधील दिगंबर नाईक, मावशी अर्थात सुप्रिया पाठारे बरोबर एक धमाल परफॉर्मन्स सादर करतील. अंजली-श्रीकांत यांचा डान्स तर असेलच पण त्याचबरोबर एक सरप्राईज परफॉर्मन्स देखील या कार्यक्रमाला चार चांद लावेल.

डान्स, मस्ती आणि गाण्यांनी परिपूर्ण असा हा धमाकेदार रिसेप्शन सोहळा मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी एक तासाच्या विशेष भागात झी वर प्रसारीत होईल.