दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित केला. पण त्याआधी त्यांनी अनेक व्यवसाय केले. त्यांनी मुद्रणाचाही व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे केला. परंतु भागीदारांशी मतभेद झाल्याने त्यांनी तो बंद केला. त्यानंतर रोज नाटक किंवा सिनेमा पाहणे सुरु होते. घरातील छोट्या-मोठ्या वस्तू विकून कसाबसा संसार सुरू होता. गिरगावात अमेरिकन इंडिया सिनेमाटोग्राफ (आता हरकिसन हॉस्पिटल आहे त्या जागी) हे तंबूतील थिएटर होते.
१५ एप्रिल १९११ रोजी दादासाहेब आपल्या पत्नी सरस्वतीबाई यांच्यासोबत तेथे सिनेमा पाहायला गेले. ते ईस्टरचे दिवस असल्याने तेथे येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील चित्रपट होता. हा चित्रपट पाहताना कोणीतरी हा व्यवसाय स्वदेशात सुरू केला पाहिजे आणि आपली पुरातन संस्कृती आणि इतिहास भारतीय व विदेशी लोकांना कळावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी स्वतःच हा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. अखेर ३ मे १९१३ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. यासाठी त्यांना सारा संसार पणाला लावावा लागला, असे दादासाहेबांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी एका लेखात लिहिले आहे. हा चित्रपट तब्बल २३ दिवस चालला.
(एक होती प्रभातनगरी – बापू वाटवे)









![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








