‘झी मराठी’वरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची परंपरा कायमच जोपासली आहे. ‘आभास हा’ ही त्यातलीच एक लोकप्रिय मालिका. या मालिकेचा एक तासाचा ‘महाएपिसोड’ येत्या रविवारी 4 डिसेंबर रोजी प्रसारीत होणार आहे.
आर्या आणि अर्जुनच्या नव्याने सुरु झालेल्या आयुष्यात मायाचा संपूर्ण सहभाग आहे असे सगळ्यांना वाटत असते. मायाचे चांगले रूप जरी सगळ्यांना दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र माया अजूनही विश्वमोहन तसेच आर्या-अर्जुनच्या विरोधात कारस्थान आखतच असते. यामध्ये ती मिताली आणि अजयलाही सामील करून घेते. या दोघांच्या मदतीने सर्व संपत्ती आपल्या नावावर करून घेण्याचा डाव माया आखते. पण मायाच्या नकळत अजय-मिताली एक वेगळाच खेळी खेळत असतात. या सर्वांच्या मध्ये विश्वमोहन लंडनवरून परत आल्यावर सामील होतो आणि सुरु होतो एका अनपेक्षित महानाट्याचा प्रारंभ.
काय असेल या महानाट्याचा शेवट ? मायाचे कारस्थान यशस्वी होईल ? अजय-मिताली मायाच्या अपरोक्ष कोणती खेळी खेळत आहेत ? अर्जुनने स्वकष्टाने कमावलेली संपत्ती तो आणि आर्या मिळून वाचवू शकेल ? माया, विश्वमोहन आणि अजय-मिताली यांच्यापैकी कोण ही संपत्ती बळकावेल ? या सर्व प्रश्नांची उत्तरं “आभास हा” च्या येत्या रविवारी, ४ डिसेंबर रोजी दाखवल्या जाणाऱ्या महाएपिसोडमध्ये मिळतील.
‘आभास हा’ मालिका विद्याधर पाठारे यांच्या आयरिस प्रॉडक्शनची निर्मिती असून अपूर्वा नेमळेकर, चैतन्य चंद्रात्रे, लोकेश गुप्ते, सुचित्रा बांदेकर, मिलिंद फाटक, अजिंक्य जोशी, या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वा. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग (महाएपिसोड) येत्या रविवारी, ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.०० वा झी मराठीवर प्रसारित होईल.









![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








